साम टिव्ही ब्युरो
बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.
तापसी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
तापसीने डीप नेक रेड आउटफिटसह अशी अॅक्सेसरी कॅरी केली आहे, ज्याला पाहून सोशल मीडिया लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.
अभिनेत्रीचा लूक वगळता सर्वांच्या नजरा तिच्या अॅक्सेसरीजवर लागल्या.
तापसी पन्नूने बोल्ड आउटफिटसह हिंदू धर्मातील देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत जड नेकलेस घातला आहे.
तापसी याच कारणामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
यह लाल रंग कब मुझे छोड़ेगा…. असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
तापसीने घातलेला नेकलेस रिलायन्स ज्वेल्सचं लेस्टेस्ट कलेक्शन आहे.