Chetan Bodke
सोनम कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
बॉलिवूडमध्ये मोजक्या चित्रपटांमध्ये काम करुन सोनमने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
सोशल मीडियवर सक्रीय असणारी सोनम कपूर नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
ब्लॅक कोट, ब्लॅक फुल्ल स्लिव्हस शर्ट आणि हाफ टॉप असा अभिनेत्रीने लूक केलेला दिसत आहे.
या लूकवर अभिनेत्रीने फॅन्सी इयर रिंग्ज वेअर केले असून लूकला साजेसा मेकअप केला आहे.
सोनम कपूरने केसामध्ये बन हेअरस्टाइल, स्मोकी मेकअप आणि आय लायनर लावत अभिनेत्रीने आपला संपूर्ण मेकअप केला.
सोनम कपूरने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत. सोनमच्या रॉयल लूकला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे.
सोनमच्या ग्लॅमरस अंदाज आणि फॅशन सेन्स इतरांपेक्षा एकदम हटके असून तिच्या फॅशनची नेहमीच चर्चा होते.