साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री श्रद्धा कपूरला आशिकी २ या चित्रपटानंतर खरी ओळख मिळाली.
श्रद्धा ही केवळ तिच्या अभिनयातूनच नाही, तर नृत्य कौशल्य आणि सौंदर्याने साऱ्यांनाच मोहीत करते.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने अभिनयाद्वारे अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात घर केलं.
श्रद्धानं सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटींमध्येही स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.
सोशल मीडियावर श्रद्धा कमालीची सक्रिय असते.
फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांना स्वतःबद्दलच्या अपडेट नेहमी देते.
नुकतेच श्रद्धाने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.
डिपनेक ब्लाऊज आणि लेहेंग्यामध्ये श्रद्धा ग्लॅमरस दिसत आहे.
आगामी काळात श्रद्धा कपूर एका चित्रपटातून झळकणार आहे.