Chetan Bodke
शोभिता धुलिपाला बॉलिवूड अभिनेत्री, क्लासिकल डान्सर आणि मॉडेल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
फिल्म इंडस्ट्रिमध्ये डेब्यु करण्याआधी शोभिताने अनेक ब्युटी अवॉर्ड्सवर आपले नाव कोरत स्वत:च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
दरम्यान, शोभिताने बॉलिवूडमध्ये ‘रमन राघव २.०’या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यु केले.
अभिनेत्रीने आतापर्यंत तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.
ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन हेवन’ या वेबसीरीजच्या माध्यमातून तिने ओटीटी विश्वात पदार्पण केलंय.
शोभिताला भरतनाट्यम आणि कुचिपुडी या दोन क्लासिकल डान्सच्या पद्धतीही येतात.
या बहुआयामी अभिनेत्रीची कायमच सोशल मीडियावर चर्चा सुरु असते.
नुकतंच अभिनेत्रीने एक हटके फोटोशूट केलं आहे, सध्या त्याची तुफान चर्चा सुरु आहे.
शोभिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या विविध लूक्सवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.