Chetan Bodke
कायमच आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत राहिलेली बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ कायमच चर्चेत असते.
अभिनेत्रीने सिनेसृष्टीत स्वतःची प्रतिमा स्वतः तयार केली असून कायमच आपल्या अभिनयाने ती चर्चेत असते.
२०२०मध्ये ‘द फॉरगॉटन आर्मी ’ या वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी शर्वरी कायमच तिच्या चित्रपटामुळे नाही तर, तिच्या लूक आणि फॅशनमुळे अधिक चर्चेत आहे.
‘बंटी और बबली २’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री शर्वरी वाघ कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनेत्रीने चाहत्यांसोबत फॅशनेबल आणि स्टायलिस्ट लूक शेअर केला असून सध्या त्या लूकची बरीच चर्चा होते.
अभिनेत्रीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या लांब लचक ड्रेसमध्ये काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
बॉडीफीट ड्रेसमध्ये अभिनेत्रीची कर्वी फिगर दिसत असून तिचं हे नवं फोटोशूट कमालीचे चर्चेत आले आहे.
शर्वरी वाघचं हे हटके फोटोशूट पाहून तिला चाहत्यांनी स्टनिंग आणि गॉर्जियस म्हणत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.