Priya More
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा 24 सप्टेंबरला विवाहबंधनात अडकले. लग्न झाल्यापासून हे कपल चर्चेत आहे.
उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले होते. आता हळूहळू परिणीती-राघवच्या प्री-वेडिंग फंक्शन्सचे फोटो समोर येत आहेत.
परिणीती आणि राघवच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला तरी देखील अजूनही त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. आता परिणीतीच्या चुडा सिरेमनीचे फोटो समोर आले आहेत.
परिणीतीने रंगबेरंगी दुपट्ट्यासह पिवळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
परिणीतीच्या दोन भावांनी तिच्या हातामध्ये कलेरा बांधल्याचे फोटोत दिसत आहे.
मृणालिनी चंद्रा यांनी परिणीती चोप्राच्या चुडा सिरेमनीसाठी खास कलेरा तयार केले होते.
परिणीती चोप्राने लग्नामध्ये गुलाबी चुड्याची निवड केली होती. या चुड्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.