साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहेत.
लवकरच येत्या काही दिवसांत ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार आहे.
कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा या महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 6 फेब्रुवारी 2023 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
यामध्ये 4 आणि 5 फेब्रुवारीला मेहंदी, हळद आणि संगीत समारंभ होणार आहे.
अलिकडेच ही जोडी शेरशाहा या चित्रपटात एकत्र दिसली होती.
चित्रपटातील दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.