Chetan Bodke
बॉलिवुडची बेबो कायमच प्रोफेशनल लाईफमुळे नाही तर खासगी आयुष्यात ही चर्चेत असते.
गेल्या अनेक दिवसांपासून करीना कपूर सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंगवर आहे.
सध्या करीना कपूर सोशल मीडियावर तिच्या ‘जाने जान’ या चित्रपटामुळे ती बरीच चर्चेत आहे.
येत्या २१ सप्टेंबरला करीना कपूरचा वाढदिवस असून तिच्या वाढदिवशी ती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.
करीनाचा हा आगामी चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
सध्या करीना कपूरसह चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
नुकतंच करीनाने चित्रपटाच्या टीमसाठी हटके लूक केला आहे. सध्या तिचा तो लूक चर्चेत आला आहे.
नुकतंच करीनाने फ्लोरल साडीतले फोटो शेअर केले आहेत, सध्या त्या फोटोंची बरीच चर्चा होत आहे.
करीनाच्या या लूकची प्रचंड चर्चा होत असून तिला नेटकऱ्यांनी आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.