Priya More
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
कंगना रनौत देखील नवरात्रीच्या रंगामध्ये रंगल्याचे दिसत आहे.
कंगना रनौतने गरबा लूकमध्ये फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
गुजराती लूकमध्ये कंगना रनौत दिसत असून तिच्या फोटोंना चांगलीच पसंती मिळत आहे.
कंगनाने लाल आणि पिवळ्या रंगाचा घागरा-चोली असा गुजराती पोषाख परिधान केला आहे.
कंगनाने केसाची वेणी, कपाळावर टिकली, लाईट मेकअप, हेव्ही इअररिंग, मॅचिंग बांगड्या घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
कंगनाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना दीड लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळालेत.
हे फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये 'तेजससोबत अहमदाबादमध्ये गरब्यासाठी सर्व तयार...' असे दिले आहे.
कंगना रनौतच्या या फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.