Priya More
बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती दिव्या खोसला कुमारने अलीकडेच ELLE ब्युटी अवॉर्ड्समध्ये तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या तिच्या 'यारियां 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
दिव्या तिच्या सौंदर्य, ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनेबल स्टाइलमुळे चर्चेत राहते.
अवॉर्ड्स शोमध्ये दिव्याने रेड कलरचा थाई-हाई स्लिट गाउन परिधान केला होता. यावेळी ती खूपच हॉट दिसत होती.
या ऑफ शोल्डर डीप नेक गाउनमध्ये तिचा लूक खूपच बोल्ड दिसत होता. तिने ड्रेससोबत ग्लोइंग मेकअप केला होता.
दिव्याने रेड कलरची डार्क लिपस्टिक आणि केस बनमध्ये बांधलं होते. तसंच तिने या ड्रेसवर स्ट्रॅपी हील्स कॅरी केल्या होत्या.
दिव्याने 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'सत्यमेव जयते-2' चित्रपटातही ती दिसली आहे.