Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल ईशा गुप्ता कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.
ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे.
ईशा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नुकतेच शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, अभिनेत्रीने मराठमोळ्या अंदाजामध्ये हटके फोटोशूट करत सर्वांचेच लक्ष वेधले.
रेड कलरची साडी परिधान करत अभिनेत्रीने आपल्या सौंदर्यात आणखीनच भर घातली आहे.
कानामध्ये झुमके, गळ्यामध्ये हार आणि लाल रंगाच्या बांगड्या असा तिने आपला लूक पुर्ण केला आहे.
"तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, मैं एक शाम चुरा लूँ अगर बुरा न लगे" असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
ईशा गुप्ता नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.