Gangappa Pujari
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.
२०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून आलियाने करिअरला सुरुवात केली होती.
करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.
त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.
'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.
सोशल मीडियावर सध्या आलियाच्या साडी लूकची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
आलियाच्या एकापेक्षा एक सुंदर अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे....
प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने आलियाचे हे खास लूक तयार केले आहेत.
सप्तरंगी साडीतील तिच्या मनमोहक फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नुकतीच आलिया रॉकी और रानी की प्रेम कहाणी चित्रपटात झळकली होती, ज्यामध्ये तिच्या साडीतील खास लूकने लक्ष वेधले आहेत.