Chetan Bodke
रुपेरी पडद्यावरच नाही तर, ओटीटी विश्वात देखील आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयासाठी आदिती राव हैदरीने ओळख निर्माण केली.
आदिती बॉलिवूडमध्ये आणि टॉलिवूड मध्ये कायम सक्रिय असते.
आदिती कायमच आपल्या अभिनयाने नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कमालीची चर्चेत असते.
आदिती नेहमीच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करत असते.
आपल्या खास दिलखेचक अदांमुळे आणि फॅशनमुळे आदितीने तिच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले.
पारंपारिक, वेस्टर्न किंवा कोणताही आऊटफिट असो, तिचे सौंदर्य चाहत्यांचे मने जिंकते.
आदितीचा कोणताही लूक असुद्या, नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होते.
२००४ मध्ये आदितीने ‘श्रीनगरम’चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
तिच्या पहिल्याच चित्रपटाला तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.