Chetan Bodke
सोशल मीडियासह ओटीटीवर सर्वाधिक धुमाकूळ घालणारी वेबसीरिज म्हणजे ‘असूर २’
या वेब सीरिजमधील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला असून सर्वच प्रेक्षकांची त्यांनी मने जिंकली आहेत.
१८ वर्षीय शुभ जोशीचे पात्र साकारणारा विशेष बन्सलने आपल्या भूमिकेने सर्वांचीच मने जिंकले.
मुळचा मुंबईकर असलेला विशेष बन्सल चा जन्म ३ ऑक्टोबर २००४ ला झालेला आहे.
या मालिकेमुळे हा बालकलाकार कमालीचा चर्चेत आला असून त्याने पूर्वी अनेक चित्रपटात आणि अनेक मालिकेतही काम केले.
अभिनेत्याने वयाच्या १० व्या वर्षी घोडेस्वारी, तिरंदाजीचं प्रशिक्षण घेतलं होतं. सोबतच त्याने आपल्या फिल्मी आयुष्यात काही ऐतिहासिक पात्र देखील साकारले.
‘बुद्ध’ मालिकेत लहानपणातील गौतम बुद्ध तर ‘सूर्यपुत्र कर्ण’ मालिकेतही त्याने कर्णाचे पात्र साकारले.
विशेषने यापूर्वी देखील अनेक वेबसीरिजमध्ये भूमिका साकारली आहे. पण तो सर्वात जास्त ‘असूर २’ या वेबसीरिजमुळे सर्वाधिक प्रकाश झोतात आला.
‘ये मेरी फॅमिली’, ‘गुटर गु ’ सोबतच ‘स्कॅम १९९२’ मध्ये ही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.