Shreya Maskar
बॉलिवूडचा सुपरस्टार टायगर श्रॉफ फक्त ३६ वर्षांचा आहे. त्याने व्यायाम, डाएट करून लोखंडासारखी शरीरयष्टी कमावली आहे. तो आपल्या फिटनेस आणि दमदार ॲक्शन सीन्ससाठी ओळखला जातो.
अलिकडेच, अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची मजबूत शरीरयष्टी स्पष्टपणे दिसत आहे. टायगर श्रॉफ सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अनेक मुलाखतींमध्ये आपले फिटनेस रुटीन सांगतो, आज आपण टायगरच्या फिटनेसचे सीक्रेट जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफच्या दिवसाची सुरुवात कार्डिओने होते. अभिनेता ४५ मिनिटे ट्रेडमिलवर धावून करतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. धावून आल्यावर तसेच तो किकबॉक्सिंग, मिक्स्ड मार्शल आर्ट्स किंवा जिम्नॅस्टिक्स करतो.
टायगर संध्याकाळी जिममध्ये डेडलिफ्ट्स, स्क्वॅट्स आणि जड वजनासह स्ट्रेंथ ट्रेनिंगचा व्यायाम करतो. तो पुल-अप्स, सेट्स करतो. त्यानंतर तो ८० ते ८५ किलो वजनासह पुल-डाउन्स करतो. त्यानंतर तो १०० किलो वजनासह लो आणि वन-आर्म डंबेल रोल्स करतो.
टायगर श्रॉफ नाश्त्याला ८ अंडी, दुपारच्या जेवणात चिकन आणि माशांसोबत ब्राऊन राईस आणि रात्रीच्या जेवणात वाफवलेल्या भाज्या व मासे, हिरव्या शेंगा किंवा ब्रोकोली खातो. या दरम्यान तो प्रोटीन शेक पितो किंवा केळे खातो.
टायगर श्रॉफ फिटनेससाठी 'नो-कार्ब' नियम फॉलो करतो. त्यामुळे संध्याकाळी ५ नंतर साखर, भात आणि बटाटे यांसारखे कर्बोदकयुक्त पदार्थ टाळतो. संध्याकाळी कर्बोदकयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट फुगणे आणि वजन वाढू शकते. त्यामुळे, त्याने संध्याकाळी कर्बोदके पूर्णपणे टाळली आहेत.
टायगर श्रॉफ अधूनमधून चॉकलेट खातो, पण जंक किंवा तेलकट पदार्थ टाळतो. तो सिगारेट आणि दारूपासून दूर राहतो.
मीडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट 'लग जा गले' हा आहे, जो १४ मे २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.