Shruti Vilas Kadam
ब्लॅक रंग जवळजवळ सर्व साड्यांवर उठून दिसतो. प्रिंटेड, सिल्क किंवा कॉटन साडी असो ब्लॅक ब्लाउज नेहमीच एलिगंट लूक देतो.
गोल्डन ब्लाउज पारंपरिक साड्यांसोबत खास शोभतो. लग्न, सण किंवा खास कार्यक्रमांसाठी हा पर्याय परफेक्ट ठरतो.
न्यूट्रल रंगांमध्ये येणारा हा ब्लाउज रंगीत, पेस्टल किंवा गडद साड्यांशी सहज जुळतो आणि क्लासिक लूक देतो.
रॉ सिल्क ब्लाउज कोणत्याही साडीला रॉयल टच देतो. लाल, मस्टर्ड, मॅरून किंवा नेव्ही ब्लू रंग उत्तम पर्याय ठरतात.
कलमकारी ब्लाउज कोणत्याही साडीवर सूट होतो. यामुळे साडीला क्लासी टच येतो आणि कोणच्याही साडीवर हा ब्लाउज उठून दिसतो.
मरुन कलरचा ब्लाउज सफेद, मरुन, पिवळ्या, हिरव्या, पर्पल, निळ्या अशा अनेक रंगांच्या साड्यांवर उठून आणि सुंदर दिसतो.
खणाचा ब्लाउज हा प्रत्येक महाराष्ट्रीयन बाईकडे असलाच पाहिजे कारण यावर पैठणीपासून साधी साडी देखील उठून दिसते.