Shruti Vilas Kadam
ब्लाउजच्या गळ्याच्या किंवा बाजूच्या भागात डबल-साइड (दोन्ही बाजू चिकटणारी) टेप लावून ब्लाउजची लूज फिटिंग लगेच सुधारू शकता.
ब्लाउज जर सैल वाटत असेल, तर सुरक्षितपणे सेफ्टी पिन लावून तो भाग घट्ट करता येतो. पिन आतल्या बाजूने लावल्यास बाहेरून दिसणार नाही.
ब्लाउज खालपासून लुज असेल तर ब्लाउजच्या मागील किंवा साइडा बांगडी आतून गुंडाळा आणि तिथे रबर बँड वापरून घट्ट करा.
जर तुम्ही हातात सुई-धागा ठेवले असतील, तर ब्लाउजच्या बाजूला काही छोटे टाके लावू शकता. नंतर आवश्यक नसल्यास ते सहज उघडता येतील.
योग्य फिटचे इनर किंवा अंडरगारमेंट वापरण्याने ब्लाउजची लुक सुधारू शकते. तसेच हलकी पॅडिंग जोडल्याने ब्लाउज अधिक घट्ट आणि चांगला दिसेल.
जर ब्लाउज कंबर किंवा छातीवर ढिला असेल तर, साडी किंवा लहंगे सोबत बेल्ट वापरू शकता. त्याशिवाय दुपट्टा ‘ड्रेप’ चांगल्या प्रकारे करून एक वेगळी स्टाईल तयार करता येते. येईल.
टेलरकडे जाण्याचा वेळ नसेल तरीही तुम्ही हे वरील सिक्रेट टिप्स वापरुन सहज आणि झटपट ब्लाउज फिट करू शकता.