Shraddha Thik
रक्तातील साखरेची वाढ शरीरातील गंभीर समस्यांचे कारण असू शकते.
सतत वाढलेली साखरेची पातळी डोळे, किडनी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
रक्तातील साखरेची वाढ ओळखणे महत्त्वाचे आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.
साखरेची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला जास्त तहान लागते आणि कोरड्या तोंडाची समस्या पुन्हा पुन्हा कायम राहते.
साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे वारंवार लघवी लागते.
अंधुक दिसणे आणि प्रयत्नाशिवाय वजन कमी होणे ही समस्या देखील साखर वाढण्याची चिन्हे आहेत.
वारंवार संसर्ग होणे आणि मूत्राशयाच्या संसर्गाच्या समस्या हे देखील साखरेची पातळी वाढण्याचे लक्षण असू शकते.