साम टिव्ही ब्युरो
रक्तचंदन हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
लाल रंगाचा हा वृक्ष अंत्यत मौल्यवान आहे.
रक्तचंदन सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात.
याप्रकारे या वृक्षाच्या पानांचा रस कृमिनाशक व सूक्ष्मजीवरोधी असल्याने जखमा स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करतात.
रक्त चंदनाचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील त्वचा चमकदार आणि उजळ बनते.
मुकामार,शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात.