Omkar Sonawane
आयुर्वेदानुसार, वारंवार गॅस होणे, पोट फुगणे आणि ढेकर येणे या समस्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीशी संबंधित असू शकतात. या समस्या कमकुवत पचनशक्तीचे संकेत मानल्या जातात. त्यामुळे आपण कधी काय आणि कशा पद्धतीने खातो, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
शक्यतो ताजे आणि किंचित गरम अन्न खावे. गरजेपेक्षा जास्त जेवणे टाळावे आणि भरगच्च पोट भरेल इतके खाऊ नये. अन्न व्यवस्थित पचण्यासाठी ते हळूहळू आणि चांगले चावून खावे.
भूक नसून ही जेवण करणे हे देखील एक कारण आहे. तर जेवणात विरुद्ध आहार म्हणजेच पचनावर विपरीत परिणाम करू शकणारे काही खाद्यपदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रात्रीचे जेवण शक्य तितक्या लवकर करावे
जेवण करताना जास्त बोलणे टाळावे. मोबाइल किंवा टीव्ही पाहत जेवण्याऐवजी शांतपणे आणि एकाग्रतेने जेवण करण्याची सवय लावावी. आपल्या शरीराची प्रकृती आणि पचनशक्ती लक्षात घेऊन आहाराची निवड करणेही महत्त्वाचे आहे.
ओवा किंवा आल्याचा वापर केला जाऊ शकतो. हे मसाले पचनाशी संबंधित समस्यांमध्ये उपयुक्त मानले जातात.
मात्र गॅस आणि ढेकरांचा त्रास वारंवार होत असेल आणि त्यासोबत पोटदुखी, उलटी किंवा अचानक वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये, अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.