Bharat Jadhav
कधीकधी सकाळी दात घासताना आपल्या हिरड्यांमधून रक्त येऊ लागते. बहुतेक लोक याला एक सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करतात.
डब्ल्यूएचओ पीआरएसईएएचच्या संचालिका डॉ. गया गमहेवेगे यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी माहिती दिली की, किरकोळ मानला जाणारा हा आजार जगभरातील एक अब्ज लोक ग्रस्त आहेत.
आपले तोंड आणि दात स्वच्छ करणे हे केवळ तोंडापुरते मर्यादित नाही; ते आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी देखील जोडलेले आहे. याचा संबंध मधुमेह आणि हृदयाच्या आरोग्याशी देखील असू शकतो.
क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, हिरड्यांमधून रक्त येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे दातांची अस्वच्छता. जेव्हा आपण आपले तोंड स्वच्छ ठेवत नाही, तेव्हा दातांवर प्लाक जमा होतो, ज्यामुळे हिरड्यांना सूज येते.
शरीरात व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन के ची कमतरता. चुकीच्या पद्धतीने बसणारी कवळी. म्हणजेच दात लावणे. गर्भधारणा किंवा मासिक पाळी दरम्यान होणारे हार्मोनल बदल होणे, रक्त पातळ करणारी औषधे घेणे.
मऊ ब्रश वापरावे. दिवसातून किमान एकदा दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढून टाकावे. जंतुनाशक माउथवॉशने चूळ भरावी. आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करावा. वर्षातून किमान दोनदा दातांची नियमित तपासणी करून घ्या. दिवसातून दोनदा फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने दात घासा.
या लेखात दिलेली माहिती केवळ आजार आणि आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आहे