ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमेरिकन मॉडेल, मीडिया व्यक्तिमत्व आणि सोशलाइट केंडल निकोल जेनर हिचा जन्म ३ नोव्हेंबर १९९५ रोजी लॉस एंजेलिस येथे झाला. ती क्रिस जेनर आणि कॅटलिन जेनर यांची मुलगी आहे.
केंडल ही जगातील सर्वात मोठी फॅशन आयकॉन मानली जाते.
केंडल जेनरची गणना अमेरिकेतील रनवे मॉडेल्समध्ये केली जाते.
केंडल जेनर एक टॉप मॉडेल असल्याने, इंस्टाग्रामवर सुमारे २६२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तिच्या एका इन्स्टा पोस्टमधून ती सुमारे ५ कोटी रुपये कमावते.
केंडल आणि कायली यांच्या कादंबरीचे नाव 'रेबल्स: सिटी ऑफ इंद्रा' असे आहे. २०१४ मध्ये त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले.
केंडल जेनरने 'लव्ह' मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केल्याने ती चर्चेत आली होती. तिच्या या फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती.
केंडल ही कायली जेनरसह केंडल आणि काइली नावाच्या ब्रँडसाठी कपडे डिझाइन करते.
केंडल जेनर २००७ मध्ये सुरू झालेल्या 'कीपिंग अप विथ द कार्दशियन्स' या रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे.