Shraddha Thik
भारत जगातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक आहे. मोठी लोकसंख्या दुचाकींवर अवलंबून आहे.
पण, तुम्हाला माहीत आहे का की रोज बाईक चालवण्याचे काही तोटे देखील होऊ शकतात?
दररोज जास्त प्रमाणात बाईक चालवल्याने गुडघे दुखू शकतात कारण बाईक चालवताना तुमचे पाय वाकलेले राहतात.
बाईक चालवल्याने पाठीवर दबाव येतो, ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते. दररोज जास्त दुचाकी चालवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.
तुम्हाला मानदुखीच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो.
अति उष्णतेमध्ये दुचाकी चालवल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. हे टाळण्यासाठी जास्त पाणी प्यावे.
सनबर्नचाही धोका असतो. शरीराचा जो भाग उघड्यावर राहतो तो सनबर्न होऊ शकतो.