Bike Battery: बाईकची बॅटरी साधारण किती वर्षे टिकते?

Surabhi Jayashree Jagdish

बॅटरी लवकर खराब होण्याची कारणे कोणती?

बाईकचा वापर अनेक दिवस केला नाही, तर बॅटरीमधील चार्ज हळूहळू कमी होतो आणि ती कमजोर होऊ शकते. बाईक सतत कमी अंतरासाठी चालवणं, बॅटरीची योग्य काळजी न घेणं आणि जास्त उष्णतेमुळेही बॅटरीचं आयुष्य कमी होतं. बॅटरीच्या वायर सैल असणं, टर्मिनलवर गंज लागणं किंवा बाईकच्या चार्जिंग सिस्टीममध्ये बिघाड असणं हीदेखील बॅटरी खराब होण्याची कारणे आहेत.

Bike Battery Maintenance | saam tv

बाईकची बॅटरी खराब होत असल्याची लक्षणं

बाईकचे सेल्फ स्टार्ट बटण दाबल्यानंतर इंजिन सुरू होण्यास वेळ लागत असेल तर बॅटरी कमजोर झाल्याचं हे एक लक्षण असू शकतं. बाईकचे हेडलाईट कमी प्रकाश देणं, हॉर्नचा आवाज कमी होणं आणि इंडिकेटर व्यवस्थित न चालणं हीदेखील बॅटरीमधील चार्ज कमी असल्याची लक्षणं आहेत.

Motorcycle Battery | saam tv

बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी काय करावं

बाईकचा नियमित वापर करावा आणि अनेक दिवस बाईक बंद ठेवणार असल्यास बॅटरीचा चार्ज तपासावा. बॅटरीचं टर्मिनल स्वच्छ आणि कोरडं ठेवावेत तसंच त्यावरील गंज वेळोवेळी काढून टाकावा. बॅटरी घट्ट बसवलेली आहे का, तिच्या वायर व्यवस्थित जोडल्या आहेत का आणि चार्जिंग सिस्टीम योग्य काम करते का, हे नियमित तपासावं.

Bike Battery Problems | saam tv

बाईकची बॅटरी कधी बदलावी?

बाईकची बॅटरी चार्ज करूनही सेल्फ स्टार्ट होत नसेल किंवा ती वारंवार डिस्चार्ज होत असेल, तर बॅटरी तपासून घ्यावी. बॅटरीला सूज आली असेल, तिच्यातून द्रव गळत असेल किंवा तिचं टर्मिनल खराब झाले असतील तर ती बदलण्याची गरज असू शकते.

Bike Battery Charging Time | saam tv

बाईकची बॅटरी चार्ज होण्यासाठी किती वेळ लागतो?

बाईकची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी साधारणपणे ५ ते १० तास लागू शकतात. पण बॅटरीची क्षमता तिच्यामधील उरलेला चार्ज आणि चार्जरची क्षमता यानुसार हा वेळ कमी किंवा जास्त होऊ शकतो. बॅटरी चार्ज करताना नेहमी योग्य क्षमतेचा चार्जर वापरावा आणि कंपनीने दिलेल्या सूचनांचे पालन करावं.

Motorcycle Battery Maintenance | saam tv

नवीन बॅटरी खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

नवीन बॅटरी खरेदी करताना आपल्या बाईकला किती व्होल्ट (V) आणि किती Ah क्षमतेची बॅटरी लागतं, हे तपासावं. बॅटरीचा आकार, टर्मिनलची जागा आणि बॅटरीचा प्रकार आपल्या बाईकला योग्य आहे का, याची खात्री करावी.

Bike Self Start Problem | saam tv

बाईकची बॅटरी किती वर्षे टिकते?

बाईकची बॅटरी साधारणपणे २ ते ५ वर्षे टिकते. पण तिचं आयुष्य बॅटरीचा प्रकार आणि वापरावर अवलंबून असते. साधारणपणे सामान्य लीड-अॅसिड बॅटरी २ ते ३ वर्षे, तर AGM प्रकारची बॅटरी ३ ते ५ वर्षे टिकू शकते. बॅटरीची नियमित देखभाल केल्यास तिचे आयुष्य वाढण्यास मदत होतं.

Bike Battery Ah Capacity | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

Bajaj Freedom 125 petrol range | saam tv
येथे क्लिक करा