Akshay Baisane | अक्षय बैसाणे
घराच्या बाहेरील भागात जलतरण तलावाजवळ दर्शनी भागाला कुंपण घातलेले आहे.
बाल्कनीच्या भिंतीवर भोवरे आणि पतंगांचा वापर करण्यात आला आहे. आठवणींच्या विश्वात घेऊन जाणारी ही बाल्कनी आहे.
बाल्कनीच्या आजूबाजूला चाळीच्या घरांच्या दारांची चित्रे आहेत. हे असे ठिकाण आहे जे पडक्या चाळीची अनुभूती देते.
बिग बॉसच्या घरात जिम एरिया देखील आहे.
आतील भागात सजावटीसाठी रिक्षाचा वापर करण्यात आला आहे.
घराच्या जवळ कारागृहही (Jail) आहे.
घरातील स्वयंपाकघर आणि जेवणाची जागाही प्रशस्त आहे.
लिव्हिंग रूम सर्वात आकर्षक आहे.
लिव्हिंग रूमला झुंबर गजऱ्याचे असून भिंतीवर गजरा आणि मुखवटे लावून वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.
कॅप्टनसाठी खास बेडरूम आहे.
बेडरूमचा अर्धा भाग लाल रंगाचा आहे.
बेडरूमचा दुसरा अर्धा भाग हिरव्या रंगाचा आहे.
बाथरूमच्या बाहेर वेटिंग एरियासाठी जंगल थीम वापरण्यात आली आहे.