ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आनंदाची बातमी
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूरने आनंदाची बातमी शेअर केली.
सई लोकूर आपल्याला चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.
सई लोकूरने आज नवरा तिर्थदीप रॉयसोबत काही फोटो, व्हिडीओ शेअर करत गुड न्यूज दिली.
सईने प्रेगन्सी किट, बाळाची सोनोग्राफी प्रिंट आणि बलूनसह फोटो काढले आहेत.
सई लोकूरने आणि तिर्थदीप रॉयने नोव्हेंबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली.
मेट्रिमोनियल साईडच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती.
सई अभिनेत्री असून तिर्थदीप आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे.
गुडन्यूज देताच अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सई लोकूरला बिग बॉस मराठी १ च्या माध्यमातून विशेष ओळख मिळाली होती.