Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस १७' विषयी नवनवीन अपडेट समोर येत आहेत.
'बिग बॉस १७' येत्या १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या एकाएका स्पर्धकांची नावं समोर येत आहेत. अभिनेत्री अंकिता लोंखडे 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी होणार आहे.
अंकिता लोंखडे ही बिग बॉसच्या १७ च्या पर्वाची सर्वात महागडी स्पर्धक असणार आहे.
अंकिता लोखंडे या पर्वाच्या प्रत्येक आठवड्यासाठी १० ते १२ लाख रूपये मानधन घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
बिग बॉसच्या घरामध्ये येण्यासाठी अंकिताची जोरदार तयारी सुरू आहे. तिने या शोसाठी तब्बल २०० आऊटफिट रेडी केले आहेत.
अंकिता लोंखडेसोबत इतर कोण-कोण स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आली नाही.