Chetan Bodke
अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा ‘बिग बॉस १७’ मुळे प्रसिद्धी झोतात आली होती.
ऐश्वर्या शर्मा सध्या सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश अंदाजामुळे तुफान चर्चेत आली आहे.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर मराठमोळी अंदाजात साडी परिधान करून खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
अभिनेत्रीने हा खास लूक ‘दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४’ साठी केलेला होता.
यावेळी तिचा पती आणि ‘बिग बॉस १७’ फेम अभिनेता नील भट्टला ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला.
अभिनेत्री फॅन्सी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
केसात फुल, गळ्यात मोत्याचा हार आणि स्टायलिश लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्रीने नव्या फोटोमध्ये एकापेक्षा एक सुंदर फोटो पोजेस दिलेल्या आहेत.
अभिनेत्रीच्या फोटोंवर दीड लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.