Chetan Bodke
भोजपुरी अभिनेत्री रश्मी देसाई नेहमीच आपल्या अभिनयासोबतच दिलखेचक अदातील फोटोंमुळे चर्चेत असते.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी रश्मी देसाई सध्या एका नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या किलर स्टाईलमधील फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर रश्मीने पांढर्या-पिवळ्या चेक प्रिंटमधील ब्रॉडनेक क्रॉपवरील खास फोटो शेअर केला आहे.
ब्रॉडनेक क्रॉपवर तिने त्यासोबत हिरवी पँट तिने परिधान केलीय. या ड्रेसवर अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते.
अभिनेत्रीने या लूकवर नॉर्मल मेकअप केला असून तिच्या ब्रेसलेटने आणि लॉकेटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतोय.
दरम्यान, रश्मीने अनेक टेलिव्हिजन शोच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान पक्के केलेय.
रश्मीने आपल्या सिनेकारकिर्दिमध्ये अनेक भाषांतील चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.