Nashik Tourism: नाशिकपासून हाकेच्या अंतरावर आहे कोणीही न पाहिलेला 'हा' धबधबा, एकदा जाल तर भारावून जाल

Dhanshri Shintre

निसर्ग

सुरगाणा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे निसर्ग पुन्हा एकदा रौद्र रूपात अवतरला आहे.

भिवतास धबधबा

या मुसळधार पावसाचा परिणाम सुरगाण्यातील प्रसिद्ध भिवतास धबधब्यावर स्पष्टपणे दिसून येतोय.

किती उंचीवर आहे?

दीडशे ते दोनशे फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा सध्या ओसंडून वाहत असून, त्याचं मनोहारी पण एकाच वेळी भयावह दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे.

शिव नदी

शिव नदीला आलेल्या पुरामुळे या धबधब्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढलेला आहे.

नाशिकपासून किती लांब?

नाशिकपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा केवळ नाशिक जिल्ह्यातील नव्हे, तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील पर्यटकांचाही लाडका पर्यटनस्थळ आहे.

पर्यटक

पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

धबधब्याच्या खाली जाणे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याच्या अगदी खाली जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे.

NEXT: हिरवा निसर्ग, घनदाट झाडी अन् सुंदर धबधबा! पश्चिम घाटातील ९ अविस्मरणीय मान्सून ट्रेक्स

येथे क्लिक करा