Tuesday Horoscope: मनावरचा ताण अन् खर्च वाढेल, 5 राशींना आर्थिक चणचण भासेल; वाचा मंगळवार राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज आत्मविश्वास चांगला राहील, मात्र मन काहीसे अस्वस्थ राहू शकते. कुटुंबाच्या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरू होण्याचे संकेत असून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मेष | Saam tv

वृषभ

मनावर ताण जाणवेल आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने आर्थिक अडचणी जाणवू शकतात, त्यामुळे सतर्क राहा.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

नोकरीत बदल होण्याची शक्यता असून सुरुवातीला अडचणी येऊ शकतात. कामानिमित्त प्रवास वाढेल आणि कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते.

Mithun | saam tv

कर्क

आत्मविश्वास चांगला असला तरी मनात गोंधळ राहू शकतो. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असून सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत.

कर्क | Saam TV

सिंह

आज मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास मजबूत राहील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून वाहन सुखातही वाढ होऊ शकते.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

नोकरीत बदल आणि कार्यस्थळ बदलण्याचे संकेत आहेत. खर्च वाढणार असल्याने आर्थिक नियोजन आवश्यक ठरेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

आत्मविश्वास चांगला राहील, मात्र मनात चढ-उतार राहतील. मित्राच्या सहकार्याने नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो, पण धावपळ वाढेल.

तुळ | saam tv

वृश्चिक

आज संयम ठेवणे फायदेशीर ठरेल. पालकांचे मार्गदर्शन मिळेल आणि मित्राच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू होण्याचे संकेत आहेत.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आत्मविश्वास चांगला राहील, मात्र मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि नवीन व्यवसायासाठी अनुकूल काळ आहे.

Dhanu Rashi | Yandex

मकर

मन जास्त अस्वस्थ राहू शकते आणि आत्मविश्वासात घट जाणवेल. व्यवसाय व आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

मकर | Saam Tv

कुंभ

आत्मविश्वास चांगला राहील, मात्र मनात बेचैनी राहू शकते. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते.

कुंभ | Saam Tv

मीन

वाणीतील गोडव्यामुळे संबंध चांगले राहतील. नोकरीत बदल व खर्च वाढण्याची शक्यता असून आर्थिक सतर्कता आवश्यक आहे.

Meen | Saam Tv

NEXT: Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

Mobile Battery Charging | Yandex
येथे क्लिक करा