Bhapa Doi Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट बनवा बंगाली स्विट डिश भापा दोई

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा


१ कप दाट दही, १ कप कंडेन्स्ड मिल्क, ½ कप फुल क्रीम दूध, स्वादानुसार वेलदोडा पूड.

Bhapa Doi Recipe

सर्व साहित्य एकत्र करा


दही, कंडेन्स्ड मिल्क आणि दूध एका मोठ्या बाउलमध्ये एकत्र करून चांगले फेटून घ्या. गाठी राहू देऊ नका.

Bhapa Doi Recipe

गोडसरपणा तपासा


मिश्रण चवीनुसार गोड हवे असल्यास थोडे अधिक कंडेन्स्ड मिल्क घालू शकता.

Bhapa Doi Recipe

मिश्रण साच्यात ओता


तयार मिश्रण एखाद्या झाकण असलेल्या स्टीलच्या डब्यात किंवा गरम सहन करणाऱ्या बाउलमध्ये ओता.

Bhapa Doi Recipe

स्टीमिंग करा (वाफेवर शिजवा)


हे डब्बे किंवा बाउल प्रेशर कुकर किंवा इडली स्टीमरमध्ये ठेवा आणि २५-३० मिनिटं वाफेवर शिजवा.

Bhapa Doi Recipe

थंड होऊ द्या व फ्रीजमध्ये ठेवा


वाफवलेला भापा दोई पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये २–३ तासांसाठी ठेवा.

Bhapa Doi Recipe

गार्निश करून सर्व्ह करा


वरून बदाम, पिस्ते, केशर किंवा वेलदोडा पूड घालून थंडगार भापा दोई सर्व्ह करा.

Bhapa Doi Recipe

Fashion Tips: श्रावणात काळ्या रंगाची साडी नेसली तर चालेल का?

Fashion Tips
येथे क्लिक करा