ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अजिंठा आणि एलोरा लेण्या या मराठवाड्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन ठिकाणं आहेत. हा एक बौद्धकालीन वास्तूशिल्पाचा नमुना मानला जातो.
सम्राट औरंगजेबाची पत्नी दिलरस बानू बेगम हिच्या स्मरणार्थ १६६० मध्ये हा मकबरा बांधला गेला. ही वास्तू हुबेहूब ताज महालसारखी दिसते.
हा किल्ला २०० मीटर उंच शंखाकृती पर्वतावर स्थित आहे. या किल्ल्याचं मूळ बांधकाम १२ व्या शतकात झालं होतं.
एलोरा लेण्यांपासून एक किलोमीटर अंतरावर हे प्राचीन देवालय वसलेलं आहे. ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक मानलं जातं.
औरंगाबाद रेल्वे स्थानकापासून हे पर्यटन स्थळ अवघ्या ६ किमीवर आहे. हा आलीशान भारतीय वास्तूशिल्पाचा अस्सल नमुना मानला जातो.
गुल मंडी हिमरू शाली आणि सुंदर साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. ही औरंगाबादमधील सुप्रसिद्ध बाजारपेठ मानली जाते.
बौद्धकालीन १२ मंदिरे नरम बेसॉल्ट दगडांत ६ व्या आणि ८ व्या शतकात कोरण्यात आली. वारसाप्रेमींच्या दृष्टीनं ही सुयोग्य वास्तू आहे.