Saam Tv
डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स संपूर्ण चेहऱ्याचा लूक खराब करतात. चेहरा फ्रेश असूनही डार्क सर्कल्समुळे थकलेला दिसतो.
काही घरगुती उपाय करून डार्क सर्कल्स कमी करता येतात. असे काही उपाय जे dermatologist ही suggest करतात.
रात्रभर चमचा फ्रिजरमध्ये ठेवावा. सकाळी तो गार चमचा डोळ्यांना लावल्याने डोळ्यांखाली आलेली सूज कमी होते.
ग्रीन टी बॅग्स डोळ्यांना लावल्याने सूज तर कमी होतेच पण जळजळणाऱ्या डोळ्यांना आराम देखील मिळतो.
मधाचा वापर औषधाबरोबर सौंदर्यप्रसांधनांनमध्ये देखील केला जातो. मध आणि गुलाबजलाचे मिश्रण चेहऱ्याला लावल्याने डोळ्यांखालच्या कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो.
बर्फ कापडात गुंडाळून डोळ्यांखाली ठेवावे. असे केल्याने डोळ्यांखालच्या रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि सूज, काळेपणा कमी होते.
काकडी आणि बटाट्याचे काप डार्क सर्कल्ससाठी उत्तम मानला जातो. हे काप डोळ्यांवर ठेवल्याने थंडावा मिळतो. काऴपटपणा कमी होतो.
डार्क सर्कल्स कायमचे कमी करण्यासाठी रोज 7 ते 8 तासांची झोप आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.