Alisha Khedekar
खजूर नैसर्गिक गोडवा देतात. लाडूंमध्ये साखरेऐवजी खजुराची पेस्ट सहज वापरता येते.
गुळामुळे पदार्थाला वेगळी चव मिळते. मात्र गूळही साखरेप्रमाणेच गोड पदार्थ आहे, त्यामुळे प्रमाणात वापरणे नेहमीच महत्त्वाचे आहे.
मध चहा, दही किंवा काही पदार्थांमध्ये गोडवा वाढवू शकतो. मधामध्येही नैसर्गिक साखर असते, हे लक्षात ठेवा.
पिकलेल्या केळ्यामुळे पदार्थांना नैसर्गिक गोडवा आणि मऊपणा मिळतो. रव्याच्या शिऱ्यामध्ये हा पर्याय चांगला ठरू शकतो.
सुकी अंजीरे भिजवून त्यांची पेस्ट बनवा. यामुळे मिठाई, लाडू किंवा डेझर्टमध्ये नैसर्गिक गोडवा वाढवता येतो.
नारळाचा वापर लाडू, पोहे किंवा डेझर्टमध्ये केल्यास चव छान लागते. मात्र नारळातील कॅलरी लक्षात घेऊन प्रमाण ठेवा.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा