ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बऱ्याचदा घरातील ज्येष्ठांकडून महिलांना गरोदरपणाच्या काळात हातात बांगड्या घालण्याचे सांगितले जाते.
विवाहित महिलांनी हातात बांगड्या घालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
मनगट कायम अॅक्टिव्ह मोडमध्ये असतं, त्यामुळं गरोदरपणात महिलांनी बांगड्या घालाव्यात, असं वडीलधाऱ्यांकडून सांगितलं जातं.
जेव्हा तुम्ही आजारी असता त्यावेळी तुमची नाडी तपासली जाते. हातात सतत बांगड्या घातल्याने तुमचे मनगटाशी सतत घर्षण होते आणि त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
तसेच काचेच्या बांगड्यांमधून होणारी कंपने खूप शक्तीशाली असतात. ही कंपने स्त्रियांना जाणवणाऱ्या तीव्र भावनांचे नियंत्रक म्हणून कार्य करतात.
बांगड्या घालण्याचे आरोग्यदायी फायदे फक्त माता किंवा गर्भवतींसाठीच नव्हे, तर ते गर्भापर्यंत पोहोचतात.
गर्भवतींनी बांगड्या घालण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे बागड्यांमधील ध्वनी गर्भाला आवश्यक ऊर्जा देते. हातात बांगड्या असल्यास प्रसूती सुलभ होते, असेही मानले जाते.