Satish Daud
पाणीपुरी असं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.
पाणीपुरीचे स्टॉल तुम्हाला प्रत्येक नाक्यावर अथवा चौकावर पाहायला मिळतात.
पण तुम्हाला माहितीये का? पाणीपुरी खाण्याचे शरीराला आश्चर्यकारक फायदे आहेत.
पाणीपुरीचे पाणी बनवण्यासाठी वाटलेले जिरे, काळे मीठ आणि पुदिन्याचा वापर करतात.
पाणीपुरीचे हे पाणी तुमचे पोट शांत ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे अॅसिडिटी समस्याही दूर होते.
वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी खाण्याचा फायदा होतो.
पाणीपुरीच्या पाण्यात जे मसाले घातले जातात ते मसाले पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात.
पाणीपुरीचे पाणी तयार करण्यासाठी शक्यतो आंबट आणि तिखट मसाले वापरतात. हे यामुळे तोंड आलेले असेल ते बरे होते.
मळमळ होत असल्यास इतर प्रकारचे जेवण जात नाही, अशावेळी पाणीपुरीची फार मदत होते.