Manasvi Choudhary
बेली फॅट कमी करण्यासाठी महिला व मुली अनेक उपाय करतात. मात्र तुम्हाला माहितीये का घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने बेली फॅट कमी करू शकता.
बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जायची गरज लागणार नाही. घरीच तुम्ही २० मिनिटे डान्स केल्याने पोटाचा घेर कमी करू शकता.
बेली फॅट लॉससाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डान्स. डान्स केल्याने शरीराच्या प्रत्येक स्नायूची हालचाल होते.
बेली फॅटसाठी 'झुंबा' हा डान्सचा प्रकार जगभरात लोकप्रिय आहे. झुंबा केल्याने पोटाच्या स्नायूंवर ताण येतो यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
हिप- हॉप डान्समध्ये खाली-वर, आजू- बाजूला, उड्या मारणे या हालचाली असतात. यामुळे कंबरेचा व्यायाम होतो त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते.
बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे २० मिनिटे डान्स करणे महत्वाचे आहे. तुम्हाला लवकरच फरक दिसून येईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.