कोमल दामुद्रे
उत्तम आरोग्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर केळी हे फळे खाण्याचा सल्ला देतात. त्यातील केळ हे फळ बाराही महिने बाजारात उपलब्ध असते.
तुम्ही देखील हे फळ खात असाल आणि त्याची साल टाकून देत असाल तर जरा थांबा.
केळ खाल्यानंतर तुम्ही साल टाकून देऊ नका.
केळीच्या सालीचा वापर केस, त्वचा आणि दातांसाठी बऱ्याचदा केला जातो
केळीची साल पाणी शुद्ध करण्यासाठी गुणकारी मानली जाते.
केळीच्या सालीचा वापर करुन तुम्ही चांदीचे दागिने आणि भांडी चमकवू शकता.
केळीच्या सालीचा वापर झाडांसाठी चांगले खत म्हणून तयार करता येते.
केळीच्या सालीचा आतील भाग शूजवर चांगला घासावा लागेल. यामुळे तुमचे शूज पुन्हा चमकण्यास मदत होईल.
चामड्याची पिशवी आणि सोफा चमकवण्यासाठी तुम्ही केळीच्या सालीचा वापर करु शकता.