Priya More
गरम मसाल्यातील तेजपत्ता आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या चहाचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.
तेजपत्त्याचा चहा शरीरात मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यास मदत करतो.
तेजपत्त्याचा चहा शरीरातील चरबी कमी करुन वजन कमी करण्यास मदत करतो.
तेजपत्त्याचा चहा तणावाची पातळी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
तेजपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.
तेजपत्त्यात पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि लोह हे गुणधर्म असतात. जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
तेजपत्त्याच्या चहामुळे हृदय निरोगी राहते. हा चहा हृदयरोगाशी लढण्यास मदत करते.
तेजपत्त्याचा चहा डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.