Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या बाथरूममध्ये काही दोष असल्यास त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर होतो.
बाथरूममध्ये आपल्याकडून नियमितपणे काही सामान्य चुका होत असतात ज्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, त्या चुका कोणत्या? हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
वास्तूशास्त्रानुसार, बाथरूमची स्वच्छता नियमितपणे करणे महत्वाचे आहे. घरातील बाथरूम अस्वच्छ असल्यास नकारात्मक प्रभाव पडतो.
बाथरूममध्ये तुटलेल्या वस्तू वापरू नका. काळ्या व निळ्या रंगाची बादली वापरणे टाळावे.
वापरलेले खराब झालेले कपडे बाथरूममध्ये ठेवू नका नियमितपणे कपडे स्वच्छ धुवून ठेवणे महत्वाचे आहे.
बाथरूममध्ये पाण्याचा अनावश्यक वापर करणे टाळा. बाथरूममध्ये नळ चालू ठेवणे देखील अशुभ मानले जाते.
खराब नळ, नळातून पाणी टपकणे हे देखील धोक्याचे संकेत दर्शवते. वास्तुशास्त्रानुसार नळ वेळीच दुरूस्ती करणे महत्वाचे आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.