Bathroom Exhaust Fan: बाथरूमचा एग्झॉस्ट फॅन कधी आणि किती वेळ चालू ठेवावा? सिक्रेट टिप्स आताच वाचा

Sakshi Sunil Jadhav

शॉवर करण्याच्या वेळी

अंघोळीला जाण्यापूर्वी एग्झॉस्ट फॅन सुरू केल्याने तयार होणारी वाफ लगेच बाहेर जाते. त्यामुळे भिंती आणि आरशांवर पाण्याचे थेंब साचत नाहीत.

bathroom exhaust fan

अंघोळीनंतर फॅन बंद करणे

बरेचजण बाथरूममधून बाहेर पडतानाच फॅन बंद करतात. पण त्यामुळे ओलावा आतच राहून फंगस वाढण्याचा धोकाही वाढतो.

bathroom exhaust fan

फॅन किती वेळ सुरु ठेवावा

अंघोळीनंतर एग्झॉस्ट फॅन 15 ते 30 मिनिटं चालू ठेवणं आवश्यक आहे. आतमध्ये खिडकी नसल्यावर तो 1 तासापर्यंत चालू ठेवा.

exhaust fan usage

घरातली आर्द्रता

घरातली आर्द्रता 30 ते 50 टक्क्यांदरम्यान असायली हवी. एग्झॉस्ट फॅन जास्तीचा ओलावा कमी करून फंगस आणि बुरशी कमी करण्याचं काम करतो.

bathroom ventilation tips

बाथरूमचे दार

अंघोळीनंतर दार किंवा खिडकी उघडी ठेवा त्याने ताजी हवा आत येते.त्यामुळे फॅन उरलेली आर्द्रता जास्त वेगाने बाहेर काढतो.

how long to run exhaust fan

केस सुकवतानाही फॅन वापरा

हेअर ड्रायर वापरताना हवेत पुन्हा ओलावा निर्माण होतो. त्यामुळे केस सुकवताना आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटं फॅन चालू ठेवा.

bathroom humidity

घाणेरडा वास

एग्झॉस्ट फॅन फक्त वाफच नाही तर टॉयलेटचा घाण वास आणि स्वच्छतेदरम्यान निर्माण होणारे रासायनिक वायूही बाहेर टाकतो.

bathroom air circulation

बाथरूम स्वच्छ करताना लक्षात ठेवा

बाथरूम स्वच्छ करताना ब्लीच किंवा इतर केमिकल वापरत असाल तर फॅन किमान 30 मिनिटं चालू ठेवा. यामुळे हानिकारक वायूंचा परिणाम कमी होतो.

fan cleaning guide

फॅनची नियमित स्वच्छता करा

दर 6 महिन्यांनी एग्झॉस्ट फॅनवरची धूळ साफ करा. धूळ साचल्यावर मोटरवर ताण येतो आणि फॅन लवकर खराब होऊ शकतो.

fan cleaning guide

NEXT: Morning Hydration: सकाळी उठताच प्या फक्त 1 ग्लास पाणी; शरीरात होतील हे 5 चांगले बदल

morning water benefits
येथे क्लिक करा