Shruti Vilas Kadam
गोल्डन कुंदन कड्यांचा सेट ड्रेसवर आकर्षक पर्याय ठरू शकतो. साडी, लेहंगा किंवा सूटसोबतही हे कडे सहज मॅच करता येतात.
पिवळा, गुलाबी, गोल्डन आणि मोत्यासारख्या शेड्स असलेला हा मल्टीकलर सेट साध्या कुर्त्यापासून साडीपर्यंत विविध आऊटफिट्ससोबत सुंदर दिसतो.
मरून काचेच्या बांगड्यांसोबत हेवी गोल्डन कड्यांचा कॉम्बिनेशन पारंपरिक लुकसाठी उत्तम आहे. साड्यांसोबतही हा सेट वापरता येतो.
मिंट ग्रीन रंगाच्या बांगड्या पेस्टल शेडच्या साडी किंवा लेहंग्यासोबत सुंदर दिसतात. गोल्डन टेंपल डिझाइन आणि सिल्व्हर कुंदन कड्यांमुळे सेटला खास लुक मिळतो.
मिंट ग्रीन आणि पर्पलसारख्या दोन रंगांचा वापर करून हा सेट तयार करता येतो. त्यामध्ये कुंदन आणि गोल्डन कड्यांची भर घातल्यास लुक अधिक आकर्षक दिसतो.
पार्टी किंंवा सण-समारंभापर्यंत वापरता येतील असे हेवी गोल्डन कंगन कलेक्शनमध्ये असायलाच हवेत. त्यांच्यासोबत रंगीत बांगड्यांचे कॉम्बिनेशन करता येते.
पिवळ्या रंगाच्या बांगड्या केवळ मॅचिंग साडीसोबतच नाही, तर लाल, हिरव्या, गुलाबी, गोल्डन आणि निळ्या साड्यांसोबतही सुंदर दिसतात.