High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात 'हे' फळं, डॉक्टरांनी सांगितले ७ फायदे

Shruti Vilas Kadam

केळ्यामध्ये असते भरपूर पोटॅशियम

केळे हे पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियमचे परिणाम कमी करण्यास आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकते.

banana | pinterest

अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास मदत

शरीरातील जास्त सोडियममुळे रक्तदाब वाढू शकतो. पोटॅशियम लघवीद्वारे अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करते.

banana | pinterest

रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यास उपयुक्त

केळ्यातील पोटॅशियम रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरील ताण कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास हातभार लागतो.

Banana

हृदयासाठीही फायदेशीर

रक्तवाहिन्यांवरील ताण कमी राहिल्यास हृदयावर येणारा अनावश्यक ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संतुलित आहारात केळ्याचा समावेश करता येतो.

Banana

मॅग्नेशियमचा चांगला स्रोत

केळ्यामध्ये मॅग्नेशियमही आढळते. हे शरीरातील विविध कार्यांसाठी महत्त्वाचे असून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

Banana | GOOGLE

Hair Care: केस लगेच फ्रिझी होतात? मग करा ‘हे’ ७ सोपे उपाय; केस दिसतील मऊ, सिल्की आणि चमकदार

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा