Ruchika Jadhav
बटाटा, मिरची यांसह केळीचे भजी खाणे अनेकांना आवडतात.
केळीचे भजी बनवणे फार सोप्प आहे. मात्र अनेकांना घरच्याघरी हे भजी बनवता येत नाहीत.
केळीचे भजी बनवण्यासाठी कायम कच्ची केळी वापरा. पिकलेल्या केळीचे भजी बनवता येत नाहीत.
कच्ची केळी आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर साल काढून याचे बारीक काप करा.
भजी बनवण्यासाठी बेसन पीठात पाणी, मीठ, हळद, तिखट आणि आवडीनुसार मसाले मिक्स करा.
तयार बॅटरमध्ये कापलेले काप तेलात चांगले गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.
तयार झाले केळ्याचे भजी. हे भजी तुम्ही अगदी बाहेर जसे मिळतात तसेच घरी देखील बनवू शकता.
भजी आणखी चवदार लागावेत यासाठी तुम्ही टोमॅटो सॉससह त्याचा अस्वाद घेऊ शकता.