Shruti Vilas Kadam
बाजऱ्याचे लाडू हे पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक गोड पदार्थ आहेत. विशेषतः हिवाळ्यात हे लाडू शरीराला उष्णता देतात आणि ऊर्जा वाढवतात. ग्रामीण भागात ते नेहमीच लोकप्रिय असतात.
बाजरा पीठ – १ कप,गूळ – ¾ कप (किसलेला),साजूक तूप – ३ ते ४ टेबलस्पून,खोबरे (किसलेले) – २ टेबलस्पून,सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते) – आवडीनुसार,वेलची पूड – ½ टीस्पून
कढईत थोडेसे तूप टाकून बाजरीचे पीठ मंद आचेवर भाजावे. पीठाचा रंग थोडा बदलल्यावर आणि सुगंध येऊ लागल्यावर ते बाजूला काढावे. यामुळे लाडूंना छान खमंग चव येते.
वेगळ्या पॅनमध्ये थोडे तूप गरम करून त्यात किसलेला गूळ टाका. मंद आचेवर गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत हलवत राहा. जास्त शिजवू नये, फक्त गूळ वितळला की गॅस बंद करा.
एका मोठ्या भांड्यात भाजलेले बाजरीचे पीठ, वितळलेला गूळ, खोबरे, सुका मेवा आणि वेलचीपूड एकत्र करा. सर्व घटक नीट मिसळा, जेणेकरून मिश्रण एकसंध होईल.
हाताला थोडं तूप लावून गरम असतानाच मिश्रणाचे लाडू वळा. लाडू पूर्ण थंड झाल्यावर ते घट्ट होतात आणि स्वादिष्ट लागतात.
हे लाडू हवाबंद डब्यात ठेवले तर १० ते १५ दिवस ताजे राहतात. बाजरीमुळे हे लाडू लोह, फायबर आणि प्रोटीन यांचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात शरीर मजबूत ठेवण्यासाठी ही रेसिपी उत्तम आहे.