कोमल दामुद्रे
बाजरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि याकडे सुपरफूड म्हणून पाहिले जात आहे.
टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी बाजरी खूप प्रभावी आहे. कारण त्यात मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते आणि फायबरचे प्रमाणही जास्त असते.
बाजरीत फायबर असल्याने शरीराला रक्तातील साखरेची पातळी चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करते.
बाजरीमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते. ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
बाजरी फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, जे पचनासाठी फायदेशीर आहेत.
बाजरी हे अँटिऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे, ज्यामुळे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होण्यास मदत होते.