Shruti Vilas Kadam
½ कप बदाम, १ लिटर दूध, ¼ कप साखर, ४–५ वेलदोडे, केशर, तूप – १ चमचा, काजू, पिस्ता (गार्निशसाठी)
बदाम ४–५ तास भिजवून ठेवा किंवा गरम पाण्यात ३० मिनिटे ठेवून सोलून घ्या. नंतर त्याची मऊ पेस्ट तयार करा.
एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. सतत ढवळत राहा जेणेकरून दूध खाली लागणार नाही.
दूध उकळल्यानंतर त्यात बदाम पेस्ट घालावी. मध्यम आचेवर ढवळत ८–१० मिनिटे शिजवावे.
खीर थोडी घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि केशर धागे टाका. हवे असल्यास वेलदोड्याची पूडही घालू शकता.
थोडं तूप गरम करून त्यात काजू, बदाम, पिस्ता परतून खिरीत घाला. त्यामुळे चव आणि लुक दोन्ही वाढतील.
बदाम खीर गरम गरम सर्व्ह करा किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खूप स्वादिष्ट लागते.