ब्रश केल्यानंतरही तोंडाचा सतत वास येतोय? 'हे' उपाय ठरतील रामबाण

कोमल दामुद्रे

आपण कितीही स्मार्ट किंवा सुंदर दिसत असलात तरीही जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक केवळ आपल्यापासून अंतरच ठेवणार नाहीत तर आपल्याशी बोलण्यासही तयार होणार नाहीत.

Mouth Smell | Canva

आपल्या तोंडातून घाण वास येऊ लागला तर त्यामागील सर्वात मोठे कारण आपले खाणपान असू शकते.

Lifestyle | Canva

डाळिंब फळाप्रमाणेच त्याची सालदेखील आरोग्यासाठी गुणकारी असते, त्याचे अनेक फायदे आहेत. या फळाची साल पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंध येणे बंद होते.

pomegranate | Canva

तुळशीची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारा घाण वास येणे बंद होते. त्यासोबतच तुळशी तोंडात आलेल्या अल्सरसारख्या समस्याही दूर करते.

Tulsi | Canva

लवंग तोंडात ठेवल्याने देखील तोंडातली दुर्गंधी घालवता येते. इतकेच नाही तर लवंग ही दात दुखत असेल तर त्यावर उपाय म्हणून वापरता येते.

Clove | Canva

बडीशेप देखील तोंडाचा वास घालवण्यासाठी परिणामकारक आहे.

Fennel | Canva

पेरुची कोवळी पाने चघळणे तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी उपयोगी ठरु शकते.

Guava leaves | Canva
येथे क्लिक करा