Bharat Jadhav
वारंवार पाठ खाजवल्याने त्वचेवर जळजळ, लालसरपणा आणि सूज येण्याची भीती असते. जर तुमच्या पाठीवरही खाज येत असेल, तर काही सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही त्वरीत आराम मिळवू शकता.
पाठीवर खाज येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्वचा कोरडी पडणे हे यामागील सर्वात सामान्य कारण आहे. हवामानातील बदल, जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा त्वचेतील ओलावा कमी झाल्यामुळे पाठीवर खाज सुटू शकते.
यासह घाम, धूळ-माती, विशिष्ट साबण किंवा डिटर्जंटची अॅलर्जी, किडा चावणे आणि त्वचेच्या समस्यांमुळेही खाज येऊ शकते. एक्झिमा आणि सोरायसिससारख्या त्वचेच्या आजारांमध्येही दीर्घकाळ खाज त्रास देऊ शकते.
जर पाठीवर अचानक तीव्र खाज सुटली असेल, तर सर्वात आधी थंड शेक घ्या. यासाठी बर्फाचे काही तुकडे एका स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि पाठीवरील खाज येणाऱ्या भागावर हलक्या हाताने लावा. या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा की बर्फ थेट त्वचेवर लावयचा नाही.
कोरड्या त्वचेमुळे होणाऱ्या खाजेवर मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर ठरते. आंघोळीनंतर त्वचा जोरात पुसू नका. पाठीवर मॉइश्चरायझर लावा. पाठीपर्यंत हात पोहोचत नसल्यास लांब हँडल असलेल्या लोशन अॅप्लिकेटरचा वापर करा.
कोरफड जेल त्वचेला थंडावा देते. पाठीवर अॅलोवेरा जेलचा पातळ थर लावल्याने खाज आणि जळजळ दूर होते. यासह कॅलामाइन लोशनचा वापरही त्वचेला आराम देतो.
उन्हाळा आणि घामामुळे खाज येत असल्यास कोमट किंवा साध्या पाण्याने आंघोळ करावी. घाम येत असेन तर कपडे लगेच बदला. जास्त घट्ट आणि सिंथेटिक कपडे घालणे टाळा. आंघोळीच्या पाण्यात ओटमील मिसळून आंघोळ केल्यानेही त्वचेला मोठा आराम मिळतो.